राज्यात चोवीस तासांत नवे १०३ रुग्ण आढळून आले असून नवीन बळींची नोंद नाही. राज्यातील सध्याच्या रुग्णांची ९८३ वर आली आहे. राज्यातील एकूण बळींची संख्या ३१६४ झाली आहे. इस्पितळांतून १४ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. १४ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासांत ५०५७ नागरिकांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले आहेत.
राज्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७२ हजार १८८ झाली आहे.
चोवीस तासांत बर्या झालेल्या आणखी ६३ रुग्णांना घरी पाठविण्यात पाठविण्यात आहे. राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६८ हजार ०४१ एवढी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५९ टक्के एवढे आहे. काल ८९ जणांनी होम आयझोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.