चोवीस तासांत देशपातळीवर १३,१५४ नवे कोरोनाबाधित

0
8

केंद्रीय आरोग्य विभागाने काल गुरूवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३ हजार १५४ रुग्ण आढळले आहेत. बुधवारच्या तुलनेत ही संख्या ४ हजारांनी अधिक आहे. त्याच वेळी एका दिवसात २६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे बिघडत चाललेली परिस्थिती पाहता महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आला आहे.

यासोबतच या ७ राज्यांमध्ये कोविड प्रोटोकॉलही लागू करण्यात आला आहे. देशात ४९ दिवसांनंतर कोविड-१९ चे दररोज १३ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, ११ नोव्हेंबर रोजी २४ तासांत संसर्गाचे १३,०९१ नवीन रुग्ण आढळले होते. आकडेवारीनुसार, देशात सलग ६३ दिवस कोविड-१९ चे दैनंदिन रुग्ण १५ हजारांपेक्षा कमी आहेत.