राज्यात चोवीस तासांत नवे ९७ रुग्ण आढळून आले आहेत. तर, ५ कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १३७६ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३१२३ एवढी आहे.
राज्यात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या बळींमध्ये चढउतार सुरू आहे. राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.५८ टक्के एवढे आहे. इस्पितळांतून १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७० हजार १९९ एवढी झाली आहे.
चोवीस तासात ३७५३ स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ९७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. गेल्या चोवीस तासांत नवीन १८ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.
नवीन ७९ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. आणखी १२९ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७०० एवढी झाली आहे.तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के एवढे आहे.