पेगासस प्रकरणावरून संसदेत गदारोळ

0
94

>> विरोधकांनी मंत्र्याच्या हातातील निवेदन फाडले

संसदेतील पावसाळी अधिवेशनात काल गुरुवारी पेगासस प्रकरणावरून जोरदार गोंधळ झाला. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हे राज्यसभेत बोलणस उभे राहिले असता त्यांच्या हातातील निवेदनाचे कागद तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी खेचून घेतले व फाडून टाकले. त्यामुळे मंत्री अश्विनी वैष्णव यांना बोलताही आले नाही. अखेर राज्यसभेचे कामकाज एक दिवसासाठी स्थगित करण्यात आले. केंद्रीय मंत्री वैष्णव बोलायला उभे राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपसभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली.

गोंधळामुळे शून्यकाळ आणि प्रश्नकाळही चालू शकला नाही. विरोधी पक्षातील काही जण, विशेषत: तृणमूल कॉंग्रेसचे खासदार उठले आणि त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातून निवेदनाचा कागद घेत फाडून टाकला.

संसदेचे कामकाज स्थगित
गुरूवारी पुन्हा एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली. परंतु कामकाज सुरू होताच कृषी कायदे, प्राणवायूची कमतरता, पेगासस प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज अवघ्या काही मिनिटांतच स्थगित करावे लागले.