चोवीस तासांत कोरोनाने राज्यात दोघांचा मृत्यू

0
35

राज्यात गेल्या चोवीस तासांत २ कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली आहे. तसेच काल मंगळवारी नवीन ४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या चारशेच्या खाली आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३१५ झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३६६ एवढी आहे. काल दिवसभरात २५१७ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.

राज्यात गेल्या चोवीस तासांत ३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९३ टक्के एवढे आहे. काल कोरोनामुक्त झाल्यामुळे २ जणांना घरी पाठविण्यात आले. तसेच कोरोनाची लक्षणे जाणवल्याने ३ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.