बायो मिथेनेशन प्रकल्पाचे आज मडगावात उद्घाटन

0
55

मडगाव नगरपालिका व पुणेस्थित ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लिमिटेडतर्फे एसजीपीडीएच्या किरकोळ मार्केट जवळ ५ टिपीडी बायो मिथेनेशन प्रकल्पाचे उद्घाटन आज दि. ३ रोजी सकाळी ११ वा. नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते होईल.

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई, आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, एसजीपीडीएचे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा, नगरविकास सचिव डॉ. तारीक थॉमस, नगरविकास खात्याचे संचालक गुरूदास पिळर्णकर, मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस, नगराध्यक्ष लिंडन परेरा, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ उपस्थित राहतील. या प्लांटसाठी १.४५ कोटी रुपये खर्च आला आहे. पुण्यातील संस्था तो प्लांट चालविणार असून त्यासाठी पाच वर्षांत त्यांना ९० हजार रुपये पालिकेला द्यावे लागतील. या प्लांटमधून सौरउर्जा वीज निर्मिती होणार असल्याचे नगराध्यक्ष परेरा यांनी सांगितले.