चीनमधून येणार्या नागरिकांना देण्यात येणारी ई-व्हिसा सुविधा भारताने तूर्त थांबवली आहे. करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, करोनाची लागण झाल्याने चीनमध्ये आतापर्यंत ३०४ जणांचा बळी गेला आहे. १४,५५२ लोकांना याची लागण झाली आहे आणि हा विषाणू भारत, अमेरिका, ब्रिटनसह अन्य २५ देशात पसरला आहे.
दरम्यान, रविवारी भारताने चीनमधील ३२४ नागरिकांना एअर इंडिया विमानाने मायदेशी परत आणले. यात भारतीयांसह मालदीवचे ७ नागरिक होते. चीनमधील वुहानमध्ये करोना व्हायरसची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे.