२० हजार कोटींचा ओडिशा घोटाळा प्रकरणी बिजू जनता दलाचे खासदार रामचंद्र हंसदा व माजी आमदार सुबर्णा नाईक यांना सीबीआयने अटक केली असून त्या दोघांनाही बीजेडीने पक्षातून निलंबित केले आहे. हंसदा व नाईक यांना शुक्रवारी सीबीआयने अटक केली होती. या प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये भाजपचे माजी आमदार हितेशकुमार बरगट्टी यांचाही समावेश आहे.