इंदिरानगर-चिंबल येथे बुधवारी मध्यरात्री दोन कुटुंबात झालेल्या भांडणात मुरगन ऊर्फ बल्लू मंजुनाथ गवंडर यांचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आला. जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. लिंगनाथ रघुनाथ पालकर, प्रतीक्षा परशुराम गवंडर, परशुराम गवंडर, हेमंत पालकर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.
इंदिरानगर-चिंबल येथील दीपेश माने यांने जुने गोवे पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. बुधवारी (दि. 31 मे) रात्री पावणेबाराच्या सुमारास सर्व चारही संशयित हे माने यांच्या घरानजीक आले. त्यांनी माने यांच्या पत्नीला अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर माने यांचा मेहुणा मुरगन ऊर्फ बल्लू गवंडर यांच्यावर संशयितांकडून हल्ला करण्यात आला. त्यात मुरगन यांचा मृत्यू झाला.
संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केल्याने जुने गोवे पोलिसांनी नाकाबंदी करून त्यांना पकडण्यात यश मिळविले.