उपहासात्मक विषयांवरील ‘चार्ली हेब्दो’ नियतकालीक ‘त्या’ दहशतवादी हल्ल्यानंतर एका आठवड्याने काल पुन्हा सुरू झाले आणि त्याच्या तब्बल ६० हजार प्रती हातोहात खपल्या. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात या नियतकालीकाच्या संपादकांसह १२ जणांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर एका आठवड्यानंतर या नियतकालीकाची प्रत खरेदी करण्यासाठी शहरात रांगा लागल्या व काही मिनिटातच ६० हजार प्रती संपल्या.