चंपई सोरेन यांच्याकडून झारखंडच्या विधानसभेत बहुमत सिद्ध

0
3

ईडीने कारवाई केल्यामुळे हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्रिपद सोडले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर चंपई सोरेन यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. काल झारखंड विधानसभेत बहुमत चाचणीवर मतदान झाले. झारखंड मुक्ती मोर्चाने 47 मते मिळवत हा प्रस्ताव जिंकला, तर विरोधात 29 मते पडली. झारखंड विधानसभेत 81 सदस्य असून बहुमताचा आकडा 41 आहे.