चंदीगडच्या महापौर निवडणुकीत लोकशाहीची हत्या : सरन्यायाधीश

0
0

चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या अभूतपूर्व घोळाबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिका बाद केल्या हे स्पष्ट झाले आहे. ते अशा पद्धतीने निवडणुका घेतात का? ही लोकशाहीची थट्टा आहे, ही लोकशाहीची हत्या आहे. या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा शब्दात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निवडणूक आयोगाला फटकारले.
28 जानेवारीला चंदीगड महापौर निवडणुकीत आप-काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली 8 मते अवैध ठरली होती. प्रत्यक्षात अनिल मसीह यांनीच ही मते छेडछाड करून बाद केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.