घन:श्याम शिरोडकर यांनी काल नगराध्यक्षपदाचा राजीनामा सादर केलेला असला, तरी काल झालेल्या मडगाव पालिका मंडळाच्या खास बैठकीत त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव १५ विरुद्ध ० मतांनी संमत करण्यात आला. यावेळी विरोधी गटाचे १० नगरसेवक अनुपस्थित होते. निर्वाचन अधिकारी म्हणून वित्त खात्याचे सचिव विकास गावणेकर यांनी काम पाहिले. यावेळी भाजपचे नगरसेवक दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ यांच्यासह सर्व १५ नगरसेवक उपस्थित होते.