३ ते ६ मे या दरम्यान होणार्या मराठी-कोंकणी राज्य चित्रपट महोत्सवानिमित्त ५ मे रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील गत काळातील आघाडीचे दिग्दर्शक, अभिनेते गुरुदत्त यांच्या जीवनावर आधारित ग्रे डस्क ऑफ गुरुदत्त’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गोवा मनोरंजन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ५ मे रोजी संध्या. ४.३० वा. मॅकेनिझ पॅलेस येथे हा कार्यक्रम होणार आहे.
गुरुदत्त यांच्या ‘बाजी’ (१९५१) ते साहब, बिवी और गुलाम (१९६२) पर्यंतच्या गाजलेल्या चित्रपटांवर स्लाईड्स, दृष्ये आणि गीते दृकश्राव्य माध्यमातून या कार्यक्रमातून सादर करण्यात येतील. मनोहर अय्यर हे गुरुदत्त यांच्या चित्रपट कारकीर्दीवर भाषण करतील. गुरुदत्त यांनी थरारपट, प्रेमपट तसेच चांगली कथा असलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपट निर्मिती क्षेत्रात त्यांना नुकसानही सोसावे लागले. तसेच वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
चित्रपट जाणकार मनोहर अय्यर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम तयार झालेला असून कित्येक ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे.