मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवार २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने राज्यातील १९१ ग्रामपंचायत सदस्य, १४ नगरपालिकांच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. सावंत राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा २.० मोहीम, शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण, राष्ट्रीय बाजारी मिशन आदी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नवीन चेहरे पंचायतीमध्ये निवडून आले आहे. स्वयंपूर्ण गोवा १.० मोहीम जुन्या पंचायत मंडळाच्या कार्यकाळात राबविण्यात आली. तर, स्वयंपूर्ण गोवा २.० मोहीम नवीन पंचायत मंडळाच्या कार्यकाळात राबविली जात आहे. लोकप्रतिनिधीबरोबरच सरकारच्या विविध खात्याचे अधिकारी, स्वयंपूर्ण मित्र सुध्दा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.