ग्रामपंचायतींच्या निवडणुक ऑक्टोबरमध्ये घ्या : लोबो

0
20

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठीच्या (ओबीसी) आरक्षणात घोळ होऊ नये, यासाठी पंचायत निवडणुका पुढे ढकलून त्या ऑक्टोबर महिन्यात घेण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

इतर मागासवर्गीयांना पंचायतींसाठी ३३ टक्के एवढे आरक्षण असून, ते त्यांना मिळायलाच हवे. मात्र, त्यासाठी गोवा सरकारला ओबीसी आयोगाकडून अहवाल मिळायला हवा, असे लोबो म्हणाले. गोवा सरकारच्या बीएलओकडून मिळणार्‍या अहवालानुसार सरकारने हे आरक्षण जाहीर केले, तर प्रकरण न्यायालयात जाईल, असा इशारा लोबो यांनी दिला.

सरकारने इतर मागासवर्गीयांच्या संख्येसाठीच्या अहवालासाठी थांबायला हवे. ओबीसी आयोगाकडून एकदा हा अहवाल आला की नंतरच सरकारने हे आरक्षण निश्‍चित करावे, अशी सूचना लोबो यांनी केली. त्यासाठी पंचायत निवडणुका पुढे ढकलून त्या ऑक्टोबर महिन्यात घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.ओबीसी आयोगाकडून ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारला सगळे तपशील मिळू शकतील. त्यामुळे सरकारने घाईगडबड करू नये, असेही ते म्हणाले.