>> फिफा फुटबॉल विश्वचषकाचा संक्षिप्त कार्यक्रम जाहीर
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता खेळविला जाणार आहे. या स्टेडियमची क्षमता ६० हजार आहे. ८० हजारांची क्षमता असलेल्या दोहातील लुसैल स्टेडियमवर १८ रोजी रात्री ८.३० वाजता ग्रँड फिनाले होणार आहे.
स्पर्धेच्या कार्यक्रमानुसार गट फेरीतील दिवसातील शेवटचा सामना रात्री १२.३० वाजता (भारतात दुसरा दिवस) खेळविला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ६.३० व रात्री ९.३० वाजता देखील सामने होणार असल्याने ‘प्राईम टाईम’ची मेजवानी फुटबॉल चाहत्यांना मिळणार आहे. गट विभागातील शेवटच्या फेरीतील सामने रात्री ८.३० व रात्री १२.३० वाजता खेळविले जातील. बाद फेरीतील सामनेदेखील याच होण्याची शक्यता आहे. १७ डिसेंबर रोजी खलिफा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये तिसर्या स्थानाची प्ले ऑफ लढत नियोजित आहे. गट फेरीतील सामने केवळ १२ दिवसांत होणार आहेत. दिवसाला चार सामने होणार असल्यामुळे बाद फेरीतील संघांना पुरेशी विश्रांती देखील मिळणार आहे.
भारताची वेळ कतारपेक्षा अडीच तासांनी पुढे आहे. भारतातील फुटबॉलची वाढती लोकप्रियता लक्षात घेतल्यास प्रसारणरकर्त्यांना चांगला टीआरपी मिळणार आहे. मध्य आशियाई व उत्तर अमेरिका भागाखेरीज सुप्रीम कमिटी फॉर डीलिव्हरी व लेगसी यांनी कतार २०२२ लोगो अनावरणासाठी निवडलेल्या १३ आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये मुंबईचा समावेश आहे. आशिया खंडात होणारा हा दुसरा विश्वचषक असेल. यापूर्वी जपान व कोरिया यांनी २००२ साली संयुक्तपणे विश्वचषकाचे आयोजन केले होेते. दिवसाला जरी चार सामने असले तरी कतारला विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी जाणार्याला सर्व सामन्यांचा आस्वाद घेता येणार आहे. सर्व स्टेडियम्स एकमेकांपासून कमाल तासाभराच्या अंतरावर असल्याने तसेच दोहा मेट्रो ट्रेनची उत्तम सोय असल्याने चाहत्यांना चाहत्यांची निराशा टळणार आहे. पात्रता फेरी व संघ निश्चित झाल्यानंतरच मार्च २०२२ मध्ये मैदानांना सामन्यांचे यजमानपद देण्यात येणार आहे.