गोव्याला विशेष दर्जा कशाला? : मुख्यमंत्री

0
89

मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्राकडून गोव्याला प्रत्येक बाबतीत विशेष दर्जा मिळाला असल्याने राज्याला ‘स्पेशल स्टेटस’ देण्याची मागणी करण्याचा प्रश्‍नच राहिलेला नाही, असे सांगून राज्याच्या अस्मितेला एकही भेग पडणार नाही याची आपले सरकार काळजी घेईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल एका प्रश्‍नावर सांगितले.

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या कारभाराचा आपण संपूर्ण आढावा घेतल्याचे सांगून माजी केंद्रीयमंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या यासंबंधीच्या आरोपात तथ्य नसल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. आयपीबी खाली गुंतवणूक करणार्‍यांमध्ये ८० टक्के गोमंतकियांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. एकूण १३४ प्रकल्पांपैकी ३८ प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगून एकूण २३ हजार रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचे ते म्हणाले.