गोव्यात ७ ऑक्टोबरला गुंतवणूक शिखर परिषद

0
42

राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने गोवा सरकार दि. ७ ऑक्टोबरला गोव्यात गुंतवणूक शिखर परिषद आयोजित करणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ नवीन गुंतवणुकीचे प्रकल्प उभारण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या परिषदेची घोषणा करताना काल सांगितले.