गोव्यात सापडले नवे गौण खनिज

0
2

गोव्यात कॅल्शियम बेंटोनेट हे नवीन गौण खनिज सापडले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात सापडलेल्या कॅल्शियम बेंटोनेट या नवीन गौण खनिजाच्या संदर्भात मेसर्स नथुरमल इको मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेडला लीज डीड सुपूर्द केली. या गौण खनिजाला ‘मुलतानी माती’ किंवा ‘फुलर्स अर्थ’ असेही म्हणतात. आयुर्वेदिक औषधे, खाद्यतेल, वाइन बनवणे, आरोग्य आणि निरोगीपणा, बांधकाम, कचरा व्यवस्थापन, शेती, पशुखाद्य इत्यादींमध्ये याचे विविध उपयोग आहेत.