गोव्यातील वाहनांना सिंधुदुर्गात प्रवेश बंद

0
165

गोवा- महाराष्ट्र सीमारेषेवर दोडामार्ग येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येऊन दोडामार्ग व साळ मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाकारला जात आहे. दोडामार्ग येथे कडेकोट नाकाबंदी केल्याने गोमंतकीय जनतेसमोर अडचण उभी राहिली आहे. याबाबत सीमेवरील पोलिसांनी सांगितले की गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रवेश बंदी करण्याचा आदेश आला आहे.