>> खेलो इंडिया अंडर-१७ राष्ट्रीय शालेय स्पर्धा
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया अंडर-१७ राष्ट्रीय शालेय स्पर्धेत काल पहिल्याचा दुसर्या दिवशी गोव्याने आणखी एका पदकाची कमाई केली. गोव्याच्या श्रुंगी बांदेकरने मुलींच्या वैयक्तिक मेडले प्रकारात हे रौप्य पदक मिळविले.
या पदकाबरोबर गोव्याच्या पदकांची संख्या ४ झाली आहे. गोव्याने ही तिन्ही पदके जलतरणमध्ये प्राप्त केली.
का स्पर्धेच्या दुसर्या दिवशी श्रुंगी बांदेकरने मुलींच्या वैयक्तिक मेडले प्रकारात ५:३४:१४ अशी वेळ देत रौप्यपदक मिळविले. पहिल्या दिवशी
गोव्याच्या झेवियर मायकल डिसोझाने १ सुवर्ण व १ रौप्य तर झिदान इक्बालने एक रौप्य पदक प्राप्त केले होते.