केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्यासाठी काहीही नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. केंद्र सरकारच्या 2026 वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात गोवा राज्यासाठी काहीही नसून गोव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यानी केला आहे. पर्यटन संरक्षणासाठी निधी नाही, म्हादई नदी, पर्यटन कौशल्य वाढी, आरोग्य क्षेत्रातील साधन सुविधांसाठी निधी नसल्याचे पाटकर म्हणाले.
गोव्यासाठी काहीही नाही ः गोवा फॉरवर्ड
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून गोव्यासाठी काहीही दिले नसल्याचे गोवा फॉरवर्ड प्रमुख विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
शेतकरी व सामान्यांकडे दुर्लक्ष ः युरी
केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील शेतकरी वर्ग व सर्वसामान्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यानी केला आहे. सरकारने आरोग्य, शिक्षण, कृषी, समाज कल्याण, तसेच अनुसूचित जाती जमाती व ओबीसी शिष्यवृत्त्या आदी निधीत कपात केली असल्याचे आलेमाव यांनी नमूद केले आहे.