गोवा सरकारतर्फे आज सार्वजनिक सुट्टी

0
107

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे गोवा सरकारने आज दि. १७ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, स्थानिक स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापने तसेच अनुदानित संस्थांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत.