राज्यात महिलांवर होणार्या अत्याचार, हल्ले अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकारात सातत्याने वाढ होत असून, काल गोवा वेल्हा येथे एका हॉटेलमध्ये देवसुरभी यदुवंशी या महिलेवर एका तरुणाने चाकू हल्ला केला. या प्रकरणी सदर महिलेने आगशी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. सदर तरुण आपल्याकडे सारखा पाहत बसला होता.
आपण त्याबाबत जाब विचारल्यानंतर त्याने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने चाकूने आपणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे यदुवंशी यांनी तक्रारीत म्हटले आहे. आपण गेल्या कित्येक वर्षांपासून गोव्यात आहे; पण यापूर्वी कधीच असा प्रकार घडला नव्हता. आता गोवा महिलांसाठी सुरक्षित नाही, अशी प्रतिक्रिया सदर महिलेने नोंदवली.