गोवा वेल्हा, मयडे संघाची आगेकूच

0
86

>> जीएफए प्रथम विभागीय लीग

गोवा वेल्हा स्पोटर्‌‌स क्लबने काल ’ंगळवारी युनायटेड क्लब ऑफ तळावलीचा ३-० असा पराभव केला. जीएफए प्रथम विभागीय लीग स्पर्धेतील हा सामना आंबेली मैदानावर खेळविण्यात आला. सामन्यातील तिन्ही गोलांची नोंद दुसर्‍या सत्रात झाली. ५८व्या मिनिटाला इरफान याडवाड याने डाव्या बगलेतून जोरदार मुसंडी मारताना एकहाती प्रयत्नाद्वारे तळावलीच्या बचावफळीला भेदत उजव्या पायाने मारलेला जोरदार फटका गोलजाळीत विसावला. यावेळी इरफानने तळावलीच्या गोलरक्षकाला चेंडू अडविण्याची काडीमात्र संधी दिली नाही. आकाश सनदीच्या कॉर्नर किकवर फ्रान्सिस फर्नांडिसने संघाचा दुसरा गोल केला. ८०व्या मिनिटाला अरुण नाईकने स्वयंप्रयत्नाच्या जोरावर संघाचा तिसरा गोल करत तळावलीच्या दारुण पराभवावर शिक्कामोर्तब केले.

धुळेर मैदानावर एएदी मयडे संघाने सां मिंगिल दी ताळगाववर ४-३ असा थरारक विजय मिळविला. रोहित तोतड याने मयडेला आघाडीवर नेल्यानंतर ताळगावने जोरदार खेळ केला. त्यांच्या एस. शिरोडकर व फिलिप यांनी अनुक्रमे १६व्या व २०व्या मिनिटाला गोल केले. अथक प्रयत्नांनंतर मयडेने अर्ध्या तासाचा खेळ झालेला असताना लॉईड मास्कारेन्हसकरवी २-२ अशी बरोबरी साधली. पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत योगेश गावसने गोल करत ताळगावला ३-२ असे पुढे नेले. दुसर्‍या सत्रात मयडेच्या नोएल डिसिल्वा व लॉईड यांनी गोल करत संघाला विजयी केले.
राय मैदानावर युथ क्लब ऑफ मनोराने ड्युन्स स्पोटर्‌‌स क्लबला ३-२ असे पराजित केले. विजयी संघाकडून स्वीडन बार्बोझा, जॉयस्टन बार्बोझा व बेन्सन फर्नांडिस यांनी गोल केले तर ड्युन्सकडून शशांक व जेसन यांनी गोलजाळीचा वेध घेतल