गोवा विद्यापीठाच्या संचालकांना धमकी

0
18

गोवा विद्यापीठाच्या निवडणुकीदरम्यान यंदा अभाविप संघटनेच्या एका कथित कार्यकर्त्यांने विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण संचालक अँथनी व्हिएगस यांच्या कार्यालयात घुसून कार्यालयातून बाहेर पडल्यास दंडुक्याने मारण्याची धमकी दिली. त्यामुळे विद्यापीठ आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी संघटनेचे उमेदवार ऋषांक नाईक यांनी केली आहे. एका विद्यार्थिनीने सदर विद्यार्थ्याने आमच्या पॅनलच्या अनेक उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न केल्यचा आरोप केला आहे.