>> फोंड्यातील सर्वसाधारण सभेत निर्णय
राज्यात दुधाचे दर यापूर्वीच लिटरमागे 50 ते 60 रु. असे भडकलेले असतानाच आता गोवा डेअरीच्या काल रविवारी झालेल्या आमसभेत परत एकदा दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी ही दरवाढ करण्याचा विचार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. रविवारी सहकार निबंधकाच्या कार्यालयातील सभागृहात ही आमसभा संपन्न झाली. यावेळी सरकार नियुक्ती अध्यक्ष पराग नगर्सेकर, सहकार निबंधक खात्याचे सतीश सावंत, रामा परब, संदीप पार्सेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गोवा डेअरीच्या कामगारांना पगारवाढ देण्यासंबंधीचा विषय यावेळी आला. पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता, याची यावेळी माहिती देण्यात आली.
फोंडा येथे गोवा डेअरीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत राज्यातील दूध उत्पादकांच्या मागणीनुसार लवकरच दूध विक्रीत वाढ करण्याचा निर्णय वार्षिक सर्व सधारण सभेत घेण्यात आला. मागील 2023-24 साली गोवा डेअरीला अंदाजे 2 कोटी 40 लाख रुपयांचा नफा झाला आहे.
प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर, सहकार खात्याचे सहनिबंधक सतीश सावंत व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. पत्रकारांना माहिती देताना अध्यक्ष पराग नगर्सेकर यांनी, गोवा डेअरीला 2 कोटी 40 लाख रुपयांचा नफा झालेला आहे. सभेत दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंबंधी प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे. दूध उत्पादकांच्या मागणीनुसार रोज मोबाईलवरून संदेशद्वारे दूध संकलनाची माहिती देण्यात येत आहे. तसेच सभेचे रेकॉर्डिंग करण्यात येत असल्याचे सांगितले.
गोवा डेअरीत मध्ये सध्या रोज 40 हजार लिटर दूध संकलन केले जात आहे. दूध दरात वाढ करून दूध उत्पादकांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी विक्रीत वाढ कारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष नगर्सेकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्याना पगारवाढ दिल्यास शेतकऱ्यांनाही दुधावर वाढ द्यावी लागेल. त्यावर दूध, दरवाढ द्यावी अशी सूचना करण्यात आल्याचे नगर्सेकर यांनी सांगितले.