गोमेकॉत १०२ दिवसांत २४० कोरोना संशयितांना डिस्चार्ज

0
115

 

कोरोना खास वॉर्डात मागील १०२ दिवसांत संशयित २४० जणांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.
गोमेकॉमध्ये ताप, श्वास घेण्यास त्रास, खोकला आदी तक्रारी घेऊन येणार्‍यांची कोविड-१९ अंतर्गत नमुन्यांची तपासणी केली जात आहे. गोमेकॉमध्ये कोविड-१९ च्या संदर्भात तक्रारी घेऊन येणार्‍या रुग्णांना कोरोना वॉर्डात दाखल करून घेतले जाते. त्यानंतर रुग्णांची कोविड चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर उपचार करून रुग्णांना घरी पाठविले जात आहे. गेल्या २९ जानेवारी पासून ९ मे पर्यतच्या १०२ दिवसांत कोरोना खास वॉर्डात २४० जणांवर उपचार करण्यात आले आहे. गोमेकॉच्या वॉर्डात सरासरी दर दिवशी किमान २ कोरोना संशयित रुग्ण दाखल होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर आत्तापर्यंत ४५२४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात ३ एप्रिलनंतर एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने घरोघरी जाऊन केलेल्या सामाजिक आरोग्य सर्वेक्षणाच्या श्‍वसनाच्या तक्रारी केलेल्या नागरिकांची कोविड १९ अंतर्गत तपासणी केली जात आहे. या सर्वेक्षणासाठी सुमारे ५ हजार लोकांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य खात्याचे कर्मचारी घरोघरी जाऊन नमुने गोळा करून तपासणीसाठी कोविड प्रयोगशाळेत पाठवत आहेत.