गोमेकॉत कोरोनाचे ४ संशयित दाखल

0
195

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास विभागात काल कोरोना संशयित ४ जणांना दाखल करण्यात आले असून या खास विभागात ७ जणांवर उपचार सुरू आहेत तर गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या १२३ नमुन्याचा अहवाल नकारात्मक आहेत.

आरोग्य खात्याने आणखी ११ जणांना क्वारंटाईऩ केले असून क्वारंटाईन केलेल्याची संख्या ३३० झाली आहे. खास विभागाकडून ८८ नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेतील १२३  नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आणखी एकही नमुना तपासणीसाठी प्रलंबित नाही. सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये ५५ जणांना ठेवण्यात आले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या तिघांनी सात दिवस सरकारी क्वारंटाईऩ आणि ७ दिवसांची होम क्वारंटाईन पूर्ण केली आहे. तर चार जणांनी सरकारी क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर त्यांना सात दिवसासाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.