बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास विभागात कोरोना संशयित २ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहेत. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ८९ नमुने नाकारात्मक आहेत.
राज्यात ३ एप्रिलनंतर एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. राज्यातील ७ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत ९५ नमुने काल पाठविण्यात आले. त्यातील ८९ नमुन्यांची तपासणी पूर्ण करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. तर, ६ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. गोमेकॉच्या कोरोना खास विभागात ४ संशयितांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याने १७ जणांना सरकारी क्वारंटाईन सुविधेखाली आणले आहेत. सरकारी क्वारंटाईन सुविधेखाली ५० जणांना ठेवण्यात आले आहेत.