गोध्रा हत्याकांडाचा मास्टरमाइंड फारूख भानला १४ वर्षांनतर अटक

0
79

संपूर्ण देशाला हादरून टाकणार्‍या गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाचा मास्टरमाइंडला काल अटक करण्यात आले. तब्बल १४ वर्षांनंतर सूत्रधार फारूख भानाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने काल सकाळी ही कामगिरी केली. त्याला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एसआयटीच्या हवाली केले जाणार आहे. फारूख भान हा कॉंग्रेसचा नेता असल्याची माहिती मिळाली आहे.

पंचमहल जिल्ह्यातील कालोल येथे फारूख भानला शिताफीने अटक करण्यात आले. फारूख हा गोध्रा महापालिकेतील माजी नगरसेवक होता. तसेच तोच गोध्रा हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. हत्याकांड घडवून आणण्यासाठी त्याने गोध्रा रेल्वे स्टेशन जवळील फूलन बाजारातील अमन गेस्ट हाउसमध्ये साथीदारांसोबत एक बैठक घेतली होती. साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यासाठी त्याने १४० लीटर पेट्रोलचीही व्यवस्था केली होती.
दरम्यान, गोध्रा हत्याकांडातील अन्य एक संशयित अबरार पठाण याला गेल्या जानेवारीत एटीएसने पालघरमधून अटक केली होती.