गेहलोत सरकारविरोधात भाजप अविश्‍वास प्रस्ताव आणणार

0
248

>> राजस्थान विधानसभेचे आजपासून अधिवेशन

राजस्थान सरकारविरोधात भाजप आज शुक्रवारी अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. आजपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनातच हा अविश्वास प्रस्ताव आणण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ही घोषणा केली. गेल्या महिन्यात झालेले सचिन पायलट यांचे बंड, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती, गेहलोत व पायलट यांची दिलजमाई या सर्व घटनांसाठी भाजप अविश्‍वास ठराव आणणार आहे.

गेहलोत-पायलट दिलजमाई?
कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी घरवापसी केल्यानंतर काल पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निवासस्थान गाठले. विधानसभा अधिवेशनापूर्वी आपली भेट घ्यावी असे गहलोत यांनी सचिन पायलट यांना कळविले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सर्व समर्थक आमदारही पोहोचले होते.