गुहेतून बाहेर येणे हा चमत्कारच!

0
150
The 12 soccer players and their coach react as they explain their experience in the cave during their news conference in the northern province of Chiang Rai, Thailand, July 18, 2018. REUTERS/Soe Zeya Tun - RC1BAD32A900

>> थायलंडमधील ‘त्या’ १२ मुलांची भावना

थायलंडच्या ज्युनियर फुटबॉल चमूतील सर्व मुले गुहेतील सुटकेनंतर आठवड्याभराचा उपचार घेतल्यानंतर काल प्रसारमाध्यमांना सामोरी गेली. सोबत त्यांचा प्रशिक्षकही होता. तब्बल १८ दिवस प्रतिकूल वातावरणात भयावह गुहेत काढूनही या मुलांची मानसिक स्थिती बिघडल्याचे जाणवले नाही. गुहेतून बाहरे येणे हा आपल्यासाठी मोठा चमत्कारच आहे, असे मत या मुलांनी पत्रकारांसमोर व्यक्त केले. २३ जूनपासून ही मुले गुहेत गायब झाली होती. सुटकेनंतर त्यांना इस्पितळात दाखल केले होते. त्यानंतर काल घरी जाऊ देण्यात आले.

मदत यंत्रणा आपल्यापर्यंत कधी पोचणार याची कोणतीच कल्पना व शाश्‍वतीही नव्हती. त्यामुळे त्या यंत्रणेवरच अवलंबून न राहता आमच्या परीने आम्ही बाहेर पडण्याचे सुरूच ठेवले होते, असे प्रशिक्षक एक्कापोल चांटापॉंग याने सांगितले.
मदत यंत्रणा सुरुवातीचे नऊ दिवस मुलांपर्यंत पोचल्या नव्हत्या. त्यामुळे खडकातून येणारे पाणी पिऊन दिवस काढण्यावाचून दुसरा मार्ग नव्हता असे मुलांनी सांगितले. इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर हे सर्वजण पत्रकारांसमोर आले त्यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आदी उपस्थित होते.

११ ते १६ वयोगटातील या १२ मुलांनी आपल्या वाईल्ड बोअर या राष्ट्रीय संघाची टी शर्टस् घातली होती. २३ जून रोजी ही मुले थायलंडमधील सदर गुहा पाहण्यास गेली होती व बाहेर पावसाचा जोर वाढल्याने आत पाणी घुसून तेथे अडकून पडली होती.