गुरूवारी सावर्डे – चांदर रेल्वे दुपदरीकरणाची पाहणी

0
42

रेेल्वे सुरक्षा आयुक्तांच्यावतीने गुरुवार दि. २३ सप्टेंबर रोजी सावर्डे ते चांदर या मडगाव विभागातील रेल्वे दुपदरीकरणाची पाहणी केली जाणार आहे. ह्या रेल्वेमार्गाची लांबी ही १५.६४ किलोमीटर एवढी आहे. प्रत्यक्षात तिनईघाट ते वास्को रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे, त्याचा हा भाग आहे. दरम्यान, सध्या कुळे हे वास्को दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

सावर्डे येथून सकाळी १०.१५ वा मोटर ट्रॉलीद्वारे या पाहणीचे काम सुरू होणार आहे. सायंकाळी ५.१५ वा. मडगांव येथे हे तपासणीचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर ६ वाजता सावर्डे ते कुडचडे मार्गाची तपासणी ६ पर्यंत केली जाईल. दुपदरीकरण केलेल्या नव्या रेल्वेमार्गावर ताशी १२० किलोमीटर एवढ्या वेगाने ही ट्रॉली धावणार आहे. त्यामुळे या दरम्यान कुणीही रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे दक्षिण पश्‍चिम रेल्वे मंडळाने कळवले आहे.