गुदिन्हो यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

0
3

वाहतूक तथा उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी केंद्रीय महामार्ग आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट काल घेतली. यावेळी गुदिन्हो यांनी दाबोळी येथे अंदाजे 650 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या येत्या 12 जुलै रोजी आयोजित भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले. तसेच, गोव्यातील रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली, अशी माहिती गुदिन्हो यांनी दिली.