गुजरात किनारपट्टीजवळ 600 कोटींचे ड्रग्ज जप्त

0
4

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने रविवारी अरबी समुद्रात भारतीय सीमेवर 86 किलो ड्रग्ज जप्त केले. त्याची किंमत 600 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. या पथकाने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 14 पाकिस्तानी व्यापाऱ्यांनाही अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ पाकिस्तानी नागरिकांना सुमारे 86 किलो ड्रग्जसह अटक करण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दलाने ट्विटरवर पोस्ट करुन माहिती दिली की, गुजरात एटीएस आणि एनसीबीने समुद्रात रात्रभर केलेल्या कारवाईत पश्चिम अरबी समुद्रात एक पाकिस्तानी बोट पकडली, ज्यामध्ये 14 पाकिस्तानी क्रू मेंबर होते. त्यांच्याकडून 86 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. या मालाची किंमत सुमारे 600 कोटी रुपये आहे. भारतीय तटरक्षक दलाला माहिती मिळाल्यानंतर या बोटीच्या शोधासाठी रात्रभर मोहीम राबविण्यात आली. पाकिस्तानी बोट पश्चिम अरबी समुद्रात पकडली गेली, ज्यामध्ये 14 पाकिस्तानी क्रू मेंबर्स होते. त्यांच्याकडून 80 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. गेल्या फेब्रुवारीमध्ये एनसीबी आणि भारतीय नौदलाने गुजरात किनाऱ्याजवळ आजपर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप पकडली होती.