गुजरातमधील अहमदाबादमध्ये काल बुधवारी कपड्यांच्या गोदामाला भीषण आग लागून नंतर इमारतीत झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर छप्पर कोसळले व ही दुर्घटना घडली.
ढिगार्याखाली ४ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी दाखल झाली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. नानुकाका इस्टेट येथील कपड्यांच्या गोदामाला ही आग लागली आहे. ढिगार्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.