गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

0
256

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल (९२) यांचे काल गुरूवारी निधन झाले. त्यांना काल सकाळी श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालायात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र कोरोनावर उपचाराने त्यांनी मात केली होती. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली.

२४ जुलै १९२८ मध्ये जुनागढ येथे केशुभाई पटेल यांचा जन्म झाला होता. त्यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर ते जनसंघ आणि भाजपसोबत जोडले गेले. काही कारणास्तव २०१२ मध्ये केशुभाई पटेल यांनी आपल्या गुजरात परिवर्तन पक्षाची स्थापना केली होती.

दोन वेळा मुख्यमंत्री
केशुभाई पटेल हे १९९५ व १९९८ असे दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते. मात्र दोन्ही वेळा त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. २००१ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. तसेच त्यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्रिपदही भूषवले होते. २००१ मध्ये केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली होती.