गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून गोव्याचा विध्वंस ः कॉंग्रेस

0
87

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने विकासाच्या नावाखाली गोव्याची लूट व विद्ध्वंस चालवला असल्याचा आरोप काल कॉंग्रेस पक्षाने केला.

कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो व यतीश नाईक म्हणाले की, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा जो कायदा आहे तो गोव्यासाठी मारक ठरणार असून भ्रष्टाचाराला त्याच्यामुळे चालना मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ गोव्याचा विद्ध्वंस करणारे प्रकल्प राज्यात आणत असून त्यामुळेच राज्यातील बिगर सरकारी संघटनांकडून प्रकल्पांना विरोध होत असल्याचे डिमेलो यांनी नजरेस आणून दिले.
५० हजार नोकर्‍या कधी

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्ङ्गे जे प्रकल्प मंजूर होणार आहेत त्याद्वारे ५० हजार गोमंतकीयांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे सरकार सांगत होते. या ५० हजार नोकर्‍या कधी मिळतील, असा सवाल यतीश नाईक यांनी यावेळी केला. मोठ्या प्रमाणात गोमंतकीय पोर्तुगाल व अन्य देशांत नोकर्‍यांसाठी जात आहेत. ते येथे नोकर्‍या मिळत नसल्यानेच असे डिमेलो यांनी स्पष्ट केले. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्ङ्गे आतापर्यंत हॉटेल प्रकल्पच आणले गेलेले असून या हॉटेलात गोमंतकीयांपेक्षा बिगर गोमंतकीयांनाच रोजगार प्राप्त होत असल्याचे डिमेलो म्हणाले.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे दरवाजे आता कायमचे बंदच केले जावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. येत्या विधानसभा अधिवेशनात राज्यातील बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्याचे जे विधेयक सरकार आणू पाहत आहे त्याला तुम्ही विरोध करणार काय, असे विचारले असता त्या विधेयकाचा योग्य तो अभ्यास करूनच कॉंग्रेस विधीमंडळ पक्ष त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे वरील व्दयींनी सांगितले.