गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – २

0
297
  • डॉ. स्वाती हे. अणवेकर
    म्हापसा

ह्या ए-A१ दुधाच्या वारंवार सेवनाने त्यात असणार्‍या Aए-१ मिल्क केसीनमुळे एक प्रकारची आंतरिक सूज शरीरात येते ज्याला वैद्यकीय भाषेत प्रदाह (इन्फ्लेमेशन) असे म्हणतात ज्यामुळे शरीरामधील लिम्फॅटिक संस्थेमध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे शरीराची चयापचय क्षमता कमकुवत बनते.

आजच्या लेखामध्ये आपण Aए-१ जातीच्या गायी, त्यापासून मिळणारे दूध आणि त्या दुधाचे स्वरूप आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे सविस्तर पाहूया.
ए-A१ प्रतीचे जीन्स हे पाश्चात्य जातीच्या गायीमध्ये आढळून येतात. त्या जातीचे शास्त्रीय नाव आहे बोस टॉरस. तर ह्या गायी कोणत्या ते आपण पाहूया.

१) होल्स्टिन आणि फ्रेशियन
२) जर्सी
३) रायशियर
४) स्कॉटिश शॉर्ट हॉर्न-बी

किंवा मग मिश्र जातीच्या गायींमध्येदेखील हा आढळतो. ह्या सर्व गायी भरपूर प्रमाणात दूध देतात. दुधात असणार्‍या बीटा केसीन प्रथिनामध्ये २०९ अमिनो ऍसिड्‌स असतात. आता ए-A१ प्रतीच्या दुधामध्ये ६७ व्या स्थानी हिस्टिडीन नावाचे मनो ऍसिड असते. आणि ह्या मनो ऍसिडमुळेच हे ए-A१ दूध शरीरात पचल्यावर ७ अमिनो ऍसिड बायोऍक्टिव्ह पेप्टाइड शरीरात सोडते ज्याला बीटाकॅसोमॉर्फिन-७ असे देखील म्हणतात. हे लहान आतड्यात सोडले जाते. हे बीटाकॅसोमॉर्फिन-७ हा एक मादक पदार्थ असतो ज्याला अर्वाचीन भाषेत ओपिऑइड डेरिव्हेटिव्ह म्हणतात. ह्यामुळेच असे ए-A१ प्राण्यांचे ए-A१ दूध पिल्याने बरेच (ऑटोइम्यून) स्वयंरोगप्रतिकारक आजार व अन्य व्याधी लोकांमध्ये बळावताना दिसून येतात. ह्या ए-A१ दुधाच्या वारंवार सेवनाने त्यात असणार्‍या Aए-१ मिल्क केसीनमुळे एक प्रकारची आंतरिक सूज शरीरात येते ज्याला वैद्यकीय भाषेत प्रदाह (इन्फ्लेमेशन) असे म्हणतात ज्यामुळे शरीरामधील लिम्फॅटिक संस्थेमध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे शरीराची चयापचय क्षमता कमकुवत बनते. त्यामुळे तोंडावर मुरूम पुटकुल्या येणे, शूलशार, वरच्या श्‍वससंस्थेचे आजार किंवा संसर्ग, दमा, ऍलर्जी ह्यांचे प्रमाण वाढते. तसेच कानाचा संसर्ग, ब्रॉन्कायटीस, टॉंसिलायटीस अशा तक्रारीदेखील वाढतात. तसेच पचनसंस्थेचे विकार निर्माण होतात आणि हे लॅक्टोज इन्टॉलरन्समुळे नव्हे तर केसोमॉर्फिनमुळे होणार्‍या हिस्टामिन रिलीज मुळे हे घडते.

अन्य आजारांमध्ये स्त्रीपुरुषांमध्ये वंध्यत्व, स्त्रियांमध्ये एन्डोमेट्रियोसिस, तसेच टाइप-१ डायबिटीज, हृदयविकार. तसेच १ वर्षाखालील मुलांमध्ये सडन् इन्फंट डेथ सिंड्रोम व मुलांमध्ये ऑटिझमचे प्रमाण वाढले आहे. तसेच लॅक्टोज इन्टॉलरन्स व कर्करोगाचे प्रमाणदेखील बरेच वाढले आहे. आणि हे सगळे आजार का होतात तर हे दूध पचल्यावर तयार होणार्‍या केसोमॉर्फिनमुळे शरीरात फ्री रॅडिकल्स निर्माण होऊन हे आजार होतात.
थोडक्यात काय तर जे दूध आपण पोषक समजतो व आरोग्यदायी म्हणून पितो व आपल्या मुलांना पाजतो. ते ए-A१ प्रजातीच्या प्राण्यांचे दूध हे दुधाच्या रूपामध्ये पांढरे विषच आहे हे ओळखून आपण ते सेवन न करणेच उत्तम.
(क्रमशः)