गाझामध्ये युद्धविराम; यूनोमध्ये प्रस्ताव मंजूर

0
19

गाझामधील संघर्ष थांबावा यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या (यूनो) सुरक्षा परिषदेत मांडण्यात आलेला युद्धविरामाचा प्रस्ताव काल मंजूर करण्यात आला. यामुळे आता हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्धभुमी बनलेल्या गाझापट्टीवर आता युद्धविराम करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी ही माहिती दिली. रमजानच्या पवित्र महिन्याचे कारण देत यूनोने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याचसोबत हमासने इस्रायलच्या ज्या नागरिकांना बंदी बनवले आहे, त्यांना बिनशर्त सोडण्याबाबतही प्रस्ताव मंजूर करण्यात आला.