गांधी जयंतीला विद्यार्थ्यांकडूनही स्वच्छता; शिक्षण खात्याचे परिपत्रक

0
105

शिक्षण खात्याचे संचालक जी. पी. भट यांनी जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे उद्या गुरुवार दि. २ ऑक्टोबर या गांधी जयंतीदिनी गांधीच्या तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांना एकत्र करून गटा गटाने स्वच्छता मोहीम राबविण्याचा आदेश दिला आहे. कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर त्यासंबंधीचा संपूर्ण अहवाल दि. १० नोव्हेंबर खात्याला पाठवून देण्यास सांगितले आहे.
गांधींच्या अहिंसात्मक तत्त्वावरही कार्यक्रम आयोजित करून त्यांची तत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनात बिंबविण्याचे प्रयत्न करावेत, अशी सूचनाही परिपत्रकात केली आहे.
दरम्यान, सर्व सरकारी कर्मचार्‍यांनाही सरकारने २ ऑक्टोबर रोजी संबंधित कार्यालयात जाऊन त्यांनी स्वच्छतेचा कार्यक्रम राबविण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे प्रथमच गांधी जयंती दिनी सर्व सरकारी कर्मचार्‍यांना कार्यालयात जाणे सक्तीचे झाले आहे.