सरकारचा निर्णय
आज गुरुवार दि. २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी सर्व कॅसिनो बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. विरोधी कॉंग्रेस पक्षाने प्रथमच ही चांगली मागणी केली होती. त्यामुळे सरकारने ती मान्य केल्याचे पर्रीकर यानी सांगितले.
बुधवारी मध्यरात्री १२ पूर्वी कॅसिनो जहाजांवर प्रवेश करणार्यांना बाहेर आल्यानंतर रात्री १२ पर्यंत जहाजावर प्रवेश मिळणार नाही, असे सांगून पुढील वर्षापासून यासंबंधी नियम अधिक कडक करणार असल्याचे त्यानी सांगितले.