गांधी जयंतीची सुट्टी रद्द नाही : मुख्यमंत्री

0
100

२ ऑक्टोबर ही गांधी जयंतीची सुट्टी औद्योगिक व व्यापारी सुट्‌ट्यांच्या यादीत नव्हती. ती टाईप करताना झालेली चूक होती, असे सांगून वरील सुट्टी कोणत्याही परिस्थितीत रद्द करणार नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. वरील चूक सर्वसाधारण प्रशासनाकडून झाली. टंकलेखन करताना झालेल्या चुकीबद्दल कुणावर कारवाई करणार, असा उलट प्रश्‍न पार्सेकर यांनी केला.