राष्ट्रीय महामार्ग 66 वरील गवंडाळी उड्डाणपूल ते खांडोळा महाविद्यालय दरम्यानचा महामार्ग येत्या 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 यावेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गवंडाळी जुने गोवा येथील रेल्वे मार्गावरील नियोजित उड्डाणपुलाच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवला जाणार आहे. हा मार्ग बंदच्या काळात वाहनांची वाहतूक माशेल- बाणस्तारी, तिवरे या मार्गावरून वळविली जाणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने कळविले आहे.