गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेतर्फे खास गाड्या

0
61

गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर खास रेलगाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०१२५३ ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शुक्रवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता सुटून ती त्याच दिवशी दुपारी १२.४५ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. त्या दिवशी गाडी क्रमांक ०१२५४ ही दुपारी १.२० वा. रत्नागिरी येथून सुटून त्याच दिवशी रात्रौ ८.५० वा. लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२५५ ही सप्टेंबर ४ व ११ रोजी नागपूर येथून दुपारी ३.५० वा. सुटून दुसर्‍या दिवशी २.१५ वाजता करमळी स्थानकावर पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२५६ ही गाडी दि. १५ व १२ सप्टेंबर रोजी करमळी येथून रात्रौ ८.१५ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्रौ ८.१० वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२५७ ही गाडी दि. ४ व १४ सप्टेंबर दरम्यान आठवड्याच्या प्रत्येक शनिवार, मंगळवार व गुरुवारी लोकमान्य टिळक येथून सकाळी १०.४० वा. सुटून त्याच दिवशी रात्रौ १०.५० वाजता सावंतवाडी रोडवर पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२५८ ही दि. ६ व १५ सप्टेंबरपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी सावंतवाडी रोड येथून रात्रौ ११.३० वा. सुटून ती लोकमान्य टिळक येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ११.५५ वा. पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२५९ ही दि. ५ ते १५ सप्टेंबरपर्यंत आठवड्याच्या रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी ११.५० वा. पनवेल येथून सुटून ती त्याच दिवशी रात्रौ १०.५० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२६० ही ४ ते १४ सप्टेंबरपर्यंत सावंतवाडी रोड येथून रात्रौ ११.३० वा. सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी १०.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२६१ ही दि. ४ ते १४ सप्टेंबर पर्यंत दररोज पनवेल येथून सकाळी ८.५५ वाजता सुटून ती त्याच दिवशी दुपारी २.३० वा. चिपळून येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१२६२ ही दि. ४ ते १५ सप्टेंबर पर्यंत चिपळूण येथून दुपारी ३.५ वा. सुटून ती त्याच दिवशी रात्रौ ८.३० वा. पनवेल येथे पोचेल.
गाडी क्रमांक ०१२६३ ही दि. ४, ५, ६ व ९ सप्टेंबर रोजी दादर येथू सकाळी ८.१५ वा. सुटून ती पाच दिवशी सायंकाळी ४.५० वा. रत्नागिरी येथे पोचेल गाडी क्रमांक ०१२६ ही दि. ४,५,६ व ९ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून सायंकाळी ५.४५ वा. सुटून दुसर्‍या दिवशी रात्रौ १२.४५ वाजता दादर येथे पोहोचणार आहे.
गाडी क्रमांक ०१२६७ ही १० सप्टेंबर रोजी दादर येथून सकाळी ८.१५ वाजता सुटून ती दुसर्‍या दिवशी सकाळी ६.३० वा. मंगळूर येथे पोहोचेल.