प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी (७०) यांचे काररोनामुळे निधन झाले. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना काल दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहत इंदौरी यांनी ट्विट करत कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. अशी विनंती केली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत आला होता.