गाववाडा-शेळवण येथील सूर्यकांत देसाई यांच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी शेवंती देसाई हिला पोलिसांनी काल न्यायालयासमोर उभी केली असता तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. मात्र दुसरा संशयित आरोपी हेमंत देसाई अजूनही फरारी आहे.
दरम्यान, सूर्यकांत देसाईचा मृत्यू डोक्यावरील गंभीर आघाताने अती रक्तस्रावाने झाल्याचे त्यांच्या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. सूर्यकांत यांचा मोठा भाऊ आपल्या कुटुंबियांसहीत विदेशात असल्याने तो आल्यानंतर सूर्यकांत यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
हेमंत देसाई सध्या फरार असून कुडचडे पोलीस त्याच्या मागावर आहेत. कुडचडे पोलीस स्थानकाचे निरीक्षक रविंद्र देसाई त्याचा कसून शोध घेत आहेत. आरोपीला लवकरात लवकर शोधून काढणार असल्याचे निरीक्षक रवींद्र देसाई यांनी सांगितले आहे.