२००४ सालच्या कथित खाण घोटाळा आरोप निश्चितीप्रकरणी सकृत दर्शनी पुरावा नसल्याने विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने मुक्त केले. आमदार कामत यांच्यासह खाणमालक डॉ. प्रफुल्ल हेदे व अँथनी डिसोझा हे या प्रकरणातील संशयित आहेत.
डॉ. हेदे यांना कुळे येथील खाण सुरू करण्याला कंडिशन ऑफ डिलची बेकायदा सवलत व बेकायदा लीज परवान्याचे नूतनीकरण केल्याचा आरोप भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या एसआयटीने केला होता व तसे आरोपपत्र दाखल केले होते. खाण कायद्याखाली कारस्थान रचणे, फसवणूक करणे व भ्रष्टाचाराच्या कलमाखाली गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने आरोपपत्र दाखल केले होते.